Breaking News

आंचलगाव येथे आ. काळे च्या हस्ते भूमिपूजन !


आंचलगाव येथे आ. काळे च्या हस्ते भूमिपूजन !

करंजी/प्रतिनिधी :
 कोपरगाव तालुक्यातील मौजे आंचलगाव येथे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा परिषद सदस्या सौ विमलताई कारभारी आगवन यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन सन २०१९-२० च्या निधीत मंजूर झालेल्या जिल्हा परिषद शाळा आंचलगाव च्या शाळा खोल्याचे भूमिपूजन आ आशुतोष दादा काळे यांच्या शुभहस्ते झाले.
   या भूमिपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सौ विमलताई आगवन, पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारी आगवन,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय आगवन, उपसभापती अर्जुन काळे, उपअभियंता उत्तम पवार, कनिष्ठ अभियंता राजेंद्र दिघे, केंद्रप्रमुख विद्याताई भोईर, मुख्याध्यापक सदाशिव म्हसाळ, सरपंच श्रीमती सुनीता शिंदे, सांडूभाई पठाण, सुखदेव शिंदे, पोपटराव शिंदे, सुनील जाधव, सतीश शिंदे, नितीन शिंदे, प्रकाश गायके, ज्ञानेश्वर शिंदे, अशोक शिंदे, दादा बनसोडे, ग्रामसेवक श्री. बागुल, कॉन्ट्रॅक्टर श्री. देशमुख आदी उपस्थित होते.