Breaking News

चर्मकार गटई कामगारांना शासनाकडुन त्वरीत आर्थिक मदत मिळावी,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने निवेदन !

चर्मकार गटई कामगारांना शासनाकडुन त्वरीत आर्थिक मदत मिळावी,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे वतीने निवेदन !
 कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
 राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे  राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनरावजी घोलप  यांनी राज्यातील सर्व पदाधिकारी व  जिल्हाध्यक्षांना दिलेल्या आदेशांनुसार आज कोपरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील 'राजगृहावर' हल्ला करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करुन  कार्यवाही करण्यात यावी
आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या चर्मकार गटई कामगारांना शासनाकडुन त्वरीत आर्थिक मदत मिळावी  तसेच चर्मोद्योग विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे
      आदी मागन्या संदर्भात सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत राष्ट्रीय चर्मकार महासंघ अहमदनगर उत्तर विभागाच्या वतीने कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तसेच मुख्यमंत्री यांना ई-मेल द्वारे निवेदन पाठवण्यात आले होते त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडुन रिप्लाय देखील आला असल्याचे कळते.
                उत्तर विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  दिलीपराव कानडे यांचे नेतृत्वाखाली काळ्या फिती लाऊन प्रथम निषेध नोंदवला गेला त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले शासनाच्या वतीने नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारत पुढील कार्यवाही करीता  वरिष्ठांना आपल्या भावना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे, युवा जिल्हाध्यक्ष दत्ता दुशिंग , जिल्हा सचिव संजय  पोटे , उपजिल्हाध्यक्ष देवीदास  कानडे ,शहर अध्यक्ष गणेश कानडे , युवा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे , युवा शहर अध्यक्ष संतोष कानडे , तालुका उपाध्यक्ष संजय सरवार  ,युवा सचिव सागर पोटे ,संतोष बारसे आदी पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.