Breaking News

कोपरगाव बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका: नगराध्यक्ष वाहडणे

कोपरगाव बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका: नगराध्यक्ष वाहडणे
करंजी प्रतिनिधी- 
कोपरगाव शहरात दिवसेंदिवस कोरोना ची संख्या वाढत असतांना हा प्रादुर्भाव वाढू नये या साठी प्रत्येक शनिवारी जनता संचारबंदी असते त्या दिवशी सर्वच शहरवासीयांनी संचारबंदीचे पालन मनापासून करणे आवश्यक आहे. त्या दिवशी सर्व डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, मेडिकल स्टोअर्स या अत्यावश्यक सेवा देखील बंद ठेवणे गरजेचे आहे. जीवनावश्यक सेवा महत्वाची आहे परंतु आज पर्यंत कोपरगाव मध्ये ३ डॉक्टर पॉजिटीव्ह आढळुन आल्याने खबरदारी चा उपाय म्हणून या वाईट काळात या जीवनावश्यक गोष्टी देखील बंद ठेवणे गरजेचे होऊन बसले आहे. शहरातील इंडियन मेडिकल असोसिएशन ने सुद्धा शहरातील सर्व डॉक्टर्सना शनिवारी पूर्ण पणे हॉस्पिटल बंद ठेवण्याची सूचना दिली असून एखादा गंभीर रुग्ण आला तरच आपण आपले हॉस्पिटल दवाखानना, किंवा मेडिकल उघडावे, कोणत्याही डॉक्टरांनी बाहेरच्या रुग्णांना शनिवारी अपॉइंटमेंट देऊ नये यदाकदाचित जर तो येणारा रुग्ण कोरोना संबंधित असल्यास सर्वाना धोका होऊ शकतो असे कोपरगाव चे नगराध्यक्ष श्री विजय वाहडणे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
       तसेच कोपरगाव शहरातील ज्या व्यापाऱ्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी स्वतःहून काही काळासाठी आपले व्यवसाय बंद ठेवणे गरजेचे आहे कारण शहरात सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळवूनच आपण कोरोनाला हरवू शकतो त्या मुळे मी कोपरगाव चा प्रथम नागरिक म्हणून सर्व शहर वासीयांना हे आव्हान विनंती पूर्वक करतो की जर रोज अशीच संख्या वाढत राहिली तर सर्वांच्या सुरशीतेसाठी जीवितेसाठी परत कोपरगाव अनियमित कालावधी साठी बंद करावे लागू शकते त्या मुळे मी सर्वाना विनंती करतो की प्रशासनावरील ताण तणाव कमी करण्यास आपण प्रशासनाचे नियम पाळत, तोंडाला मास्क बांधणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, कामाशिवाय बाहेर पडू नये या सोबत चे प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळून मदत करणे गरजचे आहे त्या मुळे कोणालाच या आर्थिक मंदी च्या काळात दंड भरावा लागणार नाही कोपरगावात प्रशासनाच्या वतीने नगरपालिका, पोलीस, महसूल बे सर्वच कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या साठी अहोरात्र रस्तावर उभे राहुन काम करत आहे तरी देखील काही मोजकेच लोक त्यांच्यावर जी सोशल मीडियातून खाल्ली उडवताय टीका करताय ते योग्य नसून सर्वांनी समजुन घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे असे आव्हान कोपरगाव नागरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री विजय वाहडणे यांनी कोपरगाव व परिसरातील नागरिकांना केले आहे.