Breaking News

जिल्ह्यात आज बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्जजिल्ह्यात आज बाधितांच्या संख्येत ७० ने वाढ ५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

अहमदनगर:
 जिल्ह्यात  काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत  रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली.  त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता ९२५ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २२६२ इतकी झाली आहे. दरम्यान, आज ५८:रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १२९१ इतकी झाली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात  कोरोना टेस्ट लॅबमध्ये आढळून आलेल्या ७० बाधित रुग्णामध्ये,  संगमनेर तालुका २४, पारनेर तालुका ०१, श्रीगोंदा तालुका ०५, नगर शहर १३, नगर ग्रामीण २३, श्रीरामपूर ०३, राहुरी ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे 

उपचार सुरू असलेले रुग्ण:९२५
बरे झालेले रुग्ण: १२९१
मृत्यू: ४६
एकूण रुग्ण संख्या:२२६२
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)