Breaking News

वडगाव सावताळ - गाजीपुर जंगलात तरुणाचा मृतदेह संशयास्पद आढळला !

वडगाव सावताळ - गाजीपुर जंगलात तरुणाचा मृतदेह
पारनेर/प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील वासुंदे येथील बोकनकवाडी येथील एका तरुणाचा तालुक्यातील वडगावसावताळ - गादजीपुर च्या जंगलात अजित रावसाहेब मदने हा 21 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळून आला आहे वनविभागाच्या वाचमेन त्या परिसरात गेला असता त्याला हा मृतदेह आढळून आला त्यांनी गावांमध्ये याबाबत माहिती दिली तसेच पोलिसांना कळवले त्यानंतर पोलिस पथक त्या ठिकाणी दाखल झाले 
तरुण ड्रायव्हर असल्याची माहिती समोर येत असून त्याच्या मृतदेहाच्या ठिकाणी दुचाकी आढळून आली आहे तरुणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने यामागे घातपात का अन्य कारण असल्याचा शोध सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत असून नेमकं कारण काय आहे याचा शोध सुरू आहे.