Breaking News

आज तालुक्यात दिवसभरात चार जण कोरोना बाधित !

आज तालुक्यात दिवसभरात चार जण कोरोना बाधित !
---------
भाळवणी दोन, दैठणे गुंजाळ एक, पाडळी दर्या एक,  जण कोरोना बाधित.
---------
भाळवणी कान्हूर पठार दैठणे गुंजाळ पाडळी दर्या हे गावे तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे तहसीलदार ज्योती देवरे आदेश !
पारनेर प्रतिनिधी - 
  पारनेर तालुक्यातील कोरोना ची संख्या वाढत आहे दि 22 जुलै रोजी तालुक्यातील भाळवणी येथील काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील 36 व 38 वर्षीय दोन व्यक्ती तर दैठणे गुंजाळ येथील 55 वर्षीय  एक व्यक्ती यांचे प्रायव्हेट लॅबचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
    दि. 22 रोजी दिवसभरात एकूण कोरोना बाधितांचे आकडा 4 वर गेला आहे.
दरम्यान दि 21 रोजी तालुक्यातील कान्हूर पठार येथील तीन जिल्हा बाहेरून वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणी खाजगी लॅब मध्ये करण्यात आली होती ते पॉझिटिव्ह आले आहेत
त्यातील मुंबईहून आलेल्या तीन जणांपैकी 32 वर्षे व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहे तर दुसरा व्यक्ती हा रांजणगाव एमआयडीसी मध्ये कामाला असून त्याचे वय 39 आहे तर तिसरी व्यक्ती ही राजगुरुनगर घेऊन आली होती तिचे वय 45 आहे या तीनही व्यक्ती वेगवेगळ्या ठिकाणाहून आले होते त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आली होते त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी खासगी लॅबमध्ये तपासणी केली होती त्यानुसार त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
दैठणे गुंजाळ येथील कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेला एक जण स्त्राव देण्यास नकार देत आहेत याबाबत पोलिसांना माहिती कळवली आहे
बाधित व्यक्ती आढळले आहे तो 100 मीटर परिसर 14 दिवसांसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. भाळवणी कान्हूर पठार दैठणे गुंजाळ पाडळी दर्या हे गावे तीन दिवसांसाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी केले आहे.