Breaking News

डाऊच खुर्द मध्ये कोरोनाचा शिरकाव !

डाऊच खुर्द मध्ये कोरोनाचा शिरकाव
करंजी प्रतिनिधी- 
आज गुरुवार दि ३० जुलै रोजी तालुक्यात दुपारपर्यंत एकूण १५ कोरोना रुग्ण आढळून आले असतांनाच दुपारनंतर तालुक्यातील डाऊच खुर्द या गावात १ कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने आज रोजी बाधित सापडलेल्या तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या १६ झाली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ के डी फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
  आज पर्यंत कोपरगाव तालुक्यातील कोरोना रुग्णाची संख्या ८७ झाली असल्याने तालुक्यातील कोरोनाची वाटचाल शंभरी च्या दिशेने सुरू झाली आहे तरी कोपरगाव तालुका प्रशासनाच्या अथक परीश्रमामुळे कोरोना रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे प्रमाण जास्त असल्याने ही एक आनंदाची बाब असली तरी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे असून गरज असेल तेहवाच घरा बाहेर पडा त्याच वेळी आपण ही कोरोना ची साखळी तोडू शकू.