Breaking News

कोपरगाव तालुक्यात कोरोनात वाढ !

कोपरगाव तालुक्यात कोरोनात वाढ !
करंजी/प्रतिनिधी :
      संपूर्ण देशात कोरोनाचा हाहाकार वाढत असतांना आता  कोपरगाव तालुक्यात देखील रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत आहे
 आज संध्याकाळी ७.३० मी ने प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोपरगाव तालुक्यात ३ कोरोना रुग्णाची भर पडली आहे, यात कोपरगाव शहरातील सुभद्रा नगर येथे ५५ वर्षीय पुरुष, धारणगाव येथे ३५ वर्षीय महिला व कोपरगाव पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वैजापूर रोड लगत रेल्वे स्टेशन च्या आसपास एक ५२ वर्षीय पुरुषाचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आढळून आला आहे, त्या मुळे सध्या असलेल्या ऍक्टिव्ह रुग्णात ३ रुग्णाची भर पडली आहे.
  करंजीकरान साठी आशादायक बातमी म्हणजे २ दिवसांपूर्वी सापडलेले करंजी परिसरातील एक ३४ वर्षीय महिला पॉसिटीव्ह आली असतांना तिच्या कुटूंबातील ६ सदस्यांना प्रशासनाने ताब्यात घेऊन नगर येथे त्यांचे स्वाब पाठवले होते ते येईपर्यंत आज सकाळी कोपरगाव आरोग्य विभागाने त्याची रॅपिड टेस्ट केली असता ती निगेटीव्ह आली होती परंतु नगर येथील रिपोर्ट येणे बाकी होते ते देखील संध्याकाळी प्राप्त झाले असून ते ६ ही अहवाल निगेटीव्ह आले आहे, अशी माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे  वैद्यकीय अधिकारी डॉ के डी फुलसौंदर यांनी सांगितले.