Breaking News

"परिक्रमा" अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन.

"परिक्रमा" अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे आयोजन.
काष्टी :-
 श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलातील अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नविन अभ्यासक्रम अवगत होण्यासाठी ऑनलाईन प्राध्यापक विकास कार्यक्रम दि. ८ जुलै रोजी आयोजित केला होता.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये एकूण ११५ अभियांत्रिकी महाविद्यालये संलग्न आहेत. या ऑनलाईन प्राध्यापक विकास कार्यक्रमांतर्गत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्व संलग्न अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागाच्या द्वितीय वर्षाच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन हा विषय शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. यासाठी संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अध्यक्षा डॉ.सौ. वर्षा पाटील यांनी परिक्रमास हा उपक्रम राबविण्यासाठी संधी दिली. या कार्यक्रमाचे दिप प्रज्वलन संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सदस्य आणि विद्यापीठाच्या या ऑनलाईन प्राध्यापक विकास कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.श्री राजेश प्रसाद आणि परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त मा.प्रतापसिंह पाचपुते यांनी केले. परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे संचालक आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांनी सर्व सहभागी विषय शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.
संगणक विभागाच्या द्वितीय वर्षाच्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड लॉजिक डिझाईन या विषयासाठी तज्ञ शिक्षक डॉ. छाया जाधव, डॉ. विनोद किंबहुणे  आणि डॉ. निलेश साबळे यांनी सर्व सहभागी विषय शिक्षकांना या विषयाचे ज्ञान अवगत करून दिले. 
       तसेच संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सदस्य डॉ. परिक्षित महल्ले आणि डॉ. आर व्ही पाटील यांनी सर्व शिक्षकांना या नवीन विषयाचे अतिरिक्त ज्ञान तसेच शिक्षकांच्या विषयाच्या अडचणी सोडवून प्रोत्साहन दिले. डॉ.शिरीष साने यांनी ऑनलाईन टिचिंग अँड लर्निंग साठी विविध माध्यमांची माहिती दिली आणि क्लास टाईम मॅनेजमेंट साठी शिक्षकांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात प्रा. राहुल रासकर, प्रा. आरती सूर्यवंशी, प्रा. सुरेखा पुरी हे समन्वयक होते आणि प्रा. स्नेहा पाटोळे यांनी सूत्र संचालन केले. याशिवाय टेक्निकल टिम मध्ये विशाल भोसले, इम्रान शेख, तेजल वाणी, संदिप गाडे होते. प्रा. प्रशांत सूर्यवंशी हे या उपक्रमाचे समन्वयक होते तसेच त्यांनी संगणक अभियांत्रिकी अभ्यास मंडळाचे या उपक्रमाची संधी दिल्याबद्दल आभार मानले.
       सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे नविन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने युनिटवार चर्चा होते, ऑनलाईन लेक्चर आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. संबंधित विषय शिक्षकांना कोणतीही शंका स्पष्ट करण्यासाठी एक व्यासपीठ मिळते. या ऑनलाईन उपक्रमाचे परिक्रमा शैक्षणिक संकुलाचे सचिव मा.श्री विक्रमसिंह पाचपुते यांनी कौतूक केले आणि सर्व शिक्षकांनी या उपक्रमाचा फायदा घेणे आवश्यक आहे असे सांगितले. शेवटी परिक्रमा शैक्षणिक संकुलाच्या अध्यक्षा डॉ. सौ.प्रतिभाताई बबनराव पाचपुते यांनी सर्वांना कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावापासून काळजी घेण्याचे नम्र आवाहन केले आणि शुभेच्छा दिल्या.