Breaking News

श्रीगोंदा तालुक्यातील सर्वसामान्य शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा – दत्तात्रय पानसरे

जिल्हा सहकारी बॅंकेच्या श्रीगोंदा तालुका विकास अधिकारीपदी व्ही बी जगताप यांची निवड

श्रीगोंदा / तालुका प्रतिनिधी 
अहमदनगर जिल्ह्याच्या कृषी विकासात जिल्हा बॅंकेचा सर्वात मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन बॅंकेचे संचालक दत्तात्रय पानसरे यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त तालुका विकास अधिका-याला निरोप आणी नवनिर्वाचित तालुका विकास अधिकारी यांचे स्वागत समारंभ प्रसंगी आयोजीत बैठकीत ते बोलत होते. 
आपण मागील काळात जिल्हा सहकारी बॅंकेच्या माध्य
मातुन काम करत असताना घेतलेल्या विविध धाडसी निर्णयामुळे जिल्हा बॅंकेला आणी तालुक्यातील उस उत्पादक व सर्वच शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. मागील काळात शेतका-यांनी जिल्हा बॅंकेच्या सोसायट्यांमार्फत घेतलेल्या कर्जाची उस बिलाच्या रकमेतुन कपात न करण्याच्या सर्वात मोठा निर्णय घेतल्याने आणी  शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफीमुळे अहमदनगर जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांना सर्वाधिक २६४ कोटींची कर्जमाफी मिळाली आणी राज्यात अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेची सर्वात जास्त कर्जमाफी झाल्याचेही त्यांनी सांगितले तसेच भविष्य काळातही जिल्हा बॅंकेच्या माध्यमातुन शेतकरी हिताचे मोठ मोठे निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले. 
मावळते तालुका विकास अधिकारी भरत इथापे हे ३० जुन रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना निरोप व नवनिर्वाचित तालुका विकास अधिकारी व्ही बी जगताप यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भरत इथापे म्हणाले कि, बॅंकेचे विद्यमान संचालक पानसरे साहेबांना सहकारात काम करण्याचा आणी सुक्ष्म नियोजनाचा दांडगा अनुभव असल्याने मला तालुक्यात बॅंकेच्या माध्यमातुन काम करताना खुप मोठा फायदा झाला आणि पाच वर्षात काम करताना कोणतीही अडचण आली नाही. त्यांच्यामुळेच मला याठिकानी कामाची मोठी संधी मिळाली असे सांगताना ते भावनिक झाले होते. 
नवनिर्वाचित तालुका विकास अधिकारी जगताप बोलताना म्हणाले कि, पानसरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला या पदावर काम करण्याची संधी मिळालेली असुन या मिळालेल्या संधीचे शेतक-यांचे हिताचे काम करताना साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त शेतका-यांना कर्ज वाटप, कर्ज वसुली यांचे योग्य नियोजन तालुक्यात करुन काम करणार आहे. गेल्या गळीत हंगामात शेतक-यांचे उस पेमेंट कपात न करता रोख पेमेंट शेतक-यांना देण्याच्या साहेबांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्याला २६४ कोटींची कर्जमाफी मिळाली या कर्जमाफीचा सर्वच स्तरातील शेतकरी बांधवांना मोठा फायदा झाला आणि अशा संचालकाच्या मार्गदर्शानाखाली काम करण्याचा मला अभिमान वाटतो आहे असे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगितले.       या कार्यक्रमासाठी काझी साहेब, बाळासाहेब साळुंके, विजय पाटोळे, ऋषीकेश भारती आदीं मान्यवरांसह तालुक्यातील सर्व शाखांचे शाखाधिकारी, ऑफीस मधील सर्व कर्मचारी तसेच सर्व सोसायट्यांचे चेअरमन व सचिव उपस्थीत होते. सदर कार्यक्रम हा शासनाचे नियम पाळुन सामाजीक अंतर राखुन घेण्यात आला.