Breaking News

निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू !

निळवंडे कालव्याच्या खड्ड्यात पडून शेतकऱ्याचा मृत्यू!

अकोले/ प्रतिनिधी
 निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्या चे सुरू असलेल्या कामाचे ठिकाणी खड्ड्यात  पडू न एका शेतकऱ्याचा  मृत्य झाला 
अकोले तालुक्यातील म्हाळादेवी गावचे शिवारातील ठाकरवाडी येथे ही घटना  घडली     शिवारातून निळवंडे धरणांचे  कालवा  करण्याचे काम सुरू होते तेथे बांधकासाठी  खोदलेल्या खड्ड्यात पडून एका शेतक-याच्या मृत्यू झाल्याची घटना  घडली आज शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली  असून चंद्रभान परशुराम हासे (वय ६१, रा. म्हाळादेवी, )असे  या मृत्यू व्यक्तीचे नाव आहे  कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह त्या ठिकाणी  आढळून आला 
या घटनेची अकोले पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
घटनास्थळीच पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन केला. तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या आठवड्यापासून  चंद्रभान हासे  हे बेपत्ता होते. ते बेपत्ता असल्याची तक्रार अकोले पोलिसांत  दिली होती.  आज शनिवारी सकाळी त्यांच्या घरा जवळ निळवंडे कालवा बांधकाम करण्यासाठी खोदून ठेवलेल्या  खड्ड्यात त्यांचा मृतदेह आढळून आला.कालव्याचे अनेक दिवसापासून काम  अर्धवट असल्याने अपघाताला निमंत्रण ठरत आहे 
सदर कालवा  चे काम करणाऱ्या  कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे 
-------