Breaking News

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज- सुमित कोल्हे

वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज-श्री. सुमित कोल्हे
    ( सौ. सिंधुताई कोल्हे यांचे वाढदिवसा निमीत्ताने वृक्ष लागवड )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
दिवसें दिवस जागतिक तापमानात भूमंडळीय वैश्षमीकरणाच्या चटक्यात सर्वजण होरपळून निघत आहे. झाडी ही माणसाच्या सुखासाठी सतत झटत असतात. वृक्ष लागवड व संवर्धन ही काळाची गरज आहे. निसर्गाची कृपा सर्वांवर व्हावी या उध्देशाने संपुर्ण कोल्हे परीवार वृक्ष संवर्धनाचे संस्कार सतत  जोपासत असतो. हाच वारसा पुढे चालविण्याचे काम संजीवनी फाउंडेशनच्या वतीने सुरू असल्याचे प्रतिपादन सचिव श्री सुमित कोल्हे यांनी केले.
    संजीवनी उद्योग समुहाचे आधारस्तंभ, माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे यांच्या पत्नी सौ. सिंधुताई कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन शुक्रवारी साईबाबा काॅर्नर ते स्टेशन रोड हा रस्ता सुशोभिकरणाचा शुभारंभ या उभयतांच्या हस्ते  फिजिकल डिस्टन्सिग पाळत वृक्षारोपनाने करण्यात आला, त्याप्रसंगी श्री कोल्हे यांनी आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे, श्री ईशान  बिपिनदादा कोल्हे, उपनगराध्यक्ष योगेश  बागुल, सर्व नगरसेवक, शिंगणापूर  ग्रामपंचायतीचे सरपंच, सर्व सदस्य, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  विविध संस्थांचे प्राचार्य, संजीवनी फाउंडेशनचे सदस्य उपस्थित होते.
      श्री कोल्हे पुढे म्हणाले की वृक्ष लागवड करणे सोपे आहे परंतु त्यांचे संगोपन करणे महत्वाचे असते. त्यासाठी संजीवनी फाउंडेशन पुर्ण काळजी घेणार असल्याचे सांगीतले. संजीवनी फाउंडेशनच्या मागणीनुुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने साईबाबा काॅर्नर ते रेल्वे स्टेशन या रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासाठी परवानगी दिली आहे. रस्त्याचे काम जस जसे होईल त्याप्रमाणे या रस्त्याच्या दुतर्फा वड व इतर झाडे लावण्यात येणार आहे. रस्ता दुभाजका मध्ये इंडियन ख्रिसमस ट्री व फुल , वेलींची झाडे लावुन हा रस्ता सुशोभित करण्यावर भर देण्यात येणार आहे. आज पर्यावरणाचा ऱ्हास  मोठ्याा प्रमाणावर होत आहे. तो थांबविण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे. पर्यावरण संतुलनासाठी माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे व सिंधुताई उर्फ माई यांनी घालुन दिलेल्या संस्कारांची जपणूक संजीवनी फाउंडेशन सतत करीत राहील, अशी  ग्वाही श्री सुमित कोल्हे यांनी दिली.