Breaking News

तिघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, राज ठाकरेंनी वर्तविले भाकित!

तिघाडी सरकार फार काळ टिकणार नाही, राज ठाकरेंनी वर्तविले भाकित!
मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर चौफेर टीका होत असताना आता खुद्द मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. यांच्यात काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टिकेल, असे वाटत नाही, असे भाकित मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्तवले आहे.
राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने विरोधी पक्षाकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर टीका केली जात आहे. त्यातच आता राज ठाकरे यांनीही महाविकास आघाडाविरोधात बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले की, राज्यातील तीन पक्षांचे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही कारण ह्या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाही. ताळमेळ जाणवत नाही. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाकीत वर्तवले.