Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात एक डॉक्टरसह दोघांना कोरोनाची लागण !

कोळगाव/प्रतिनिधी 
श्रीगोंदा शहरात आज एका वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरला कोरोनाची लागण झाल्याने श्रीगोंदा शहर तसेच तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली असतानाच तालुक्यातील चिंभळे तसेच चांभूर्डी येथे प्रत्येकी एक असे एकूण ३ रुग्ण श्रीगोंदा तालुक्यात आढळून आले असून डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्या सुमारे २८ जणांचे घशातील स्त्राव घेण्यात आले आहेत तर चिंभळे तसेच चांभूर्डी येथील रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू असल्याचे डॉ नितीन खामकर यांनी दिली.