Breaking News

जामखेडला आणखी दोन कोरोना बाधित!

जामखेड/प्रतिनिधी :
    खर्डा पंचक्रोशीतील गावांमध्ये खळबळ उडाली आहे कारण दिनांक ७ जुलै, २०२० रात्री उशिरा ११.१० वा आलेल्या रिपोर्टमध्ये जामखेड तालुक्यातील लोणी येथील आणखी ०२ कोरोना बाधित आढळले आहेत.
    सदर कोरोना बाधित पूणे येथून प्रवास करून आलेले आहेत. दोन दिवसांपूर्वी खर्डा पंचक्रोशीतील मोहरी गावातून एक कोरोना बाधित आढळून आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून खर्डा शहर तीन दिवसांसाठी पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय खर्डा ग्रामपंचायतने घेतला आहे.