Breaking News

तर विज कंत्राटी कामगार पुन्हा संपावर जातील !

तर  विज कंत्राटी कामगार पुन्हा संपावर जातील !

अकोले/प्रतिनिधी :
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने महराष्ट्रातील महानिर्मिती,महापारेषण,महावितरण कंपनीत गेली अनेक वर्षे सातत्याने व नियमित पणे गरजेनुसार काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्न व प्रलंबित मागण्यासाठी मंगळवार दि ७ जून मध्यरात्री पासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले होते.आठ जुलै ला मंत्रालयात उर्जा मंत्री नितीन राउत यांच्या मध्यस्थीने व वीज मंडळातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थित वीज कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगळे यांच्या बरोबर चर्चा होऊन लवकरच संघटने बरोबर सविस्तर चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन उर्जा मंत्री यांनी दिले होते.व त्याला अनुसरून बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्यात आले होते.
       मात्र आध्याप या बाबत संघटनेला चर्चेला पाचारण करण्यात आले नाही त्या मुळे कंत्राटी कामगारामध्ये असंतोष पसरत असून कोरोना कालावधीत आठरा कामगार प्राणास मुकले तर सोळा कामगार जबर जायबंदी झाले आहेत.त्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी,कंत्राटी कामगारांना ठेकेदार विरहीत वेतन मिळावे,कंत्राटी कामगारांना कायम स्वरूपी सेवेत घ्यावे या संघटनेच्या प्रमुख मागण्या असून या वर उर्जा मंत्री काय निर्णय घेतात या कडे राज्यातील कंत्राटी वीज कामगारांचे लक्ष लागले असून या बाबत सकारात्मक तोडगा न निघाल्यास पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले जाईल असा इशारा वीज कंत्राटी कामगार संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश शिंदे व सचिव सचिन पाटील यांनी दिला आहे.