Breaking News

पारनेर तालुक्यात, कृषि विभागामार्फत कृषि सेवा केंद्रांवर धडक कारवाई !

" पारनेर तालुक्यात, कृषि विभागामार्फत कृषि सेवा केंद्रांवर धडक कारवाई"
   
तालुक्यातील 44 कृषि सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटीसा

तालुक्यातील 4 कृषी सेवा केंद्रावर निलंबनासाठी प्रस्ताव केले जाणार

कृषी अधिकारी यांची तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर धडक कार्यवाई 
पारनेर /प्रतिनिधी : 
पारनेर तालुक्यात कृषि विभागाच्या भरारी पथकाने दिनांक १८ जुलै ते
१ ९ जुलै २०२० रोजी अचानक तपासणी करून एकूण ४४ कृषि सेवा केंद्राची तपासणी
करण्यात आली.या वेळी १७ कृषि सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आलेल्या असुन
यापुर्वी या धडक मोहिमे अंतर्गत मोठया प्रमाणात त्रुटी आढळुन आलेल्या ४ कृषि सेवा केंद्रावर
निलंबनासाठी प्रस्ताव केले जाणार आहेत.
जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या आदेशान्वये दोन दिवस नेमुन
दिलेल्या पथकाचे प्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी गहिनीनाथ कापसे, तालुका कृषि
अधिकारी रामदास दरेकर, पंचायत समिती कृषि अधिकारी वाळीबा उघडे, कृषि अधिकारी किरण
पिसाळ, वैभव थोरे, ईश्वर यादव यांच्या पथकाने पारनेर तालुक्यातील कृषि सेवा केंद्रांची तपासणी
करण्यात आली.त्यापैकी काही कृषि सेवा केंद्र चालकांवर कारवाई केली जाणार आहे.