Breaking News

संगमनेर मधील कोरोना सत्र थांबेना नव्याने दोन कोरोना पॉजिटीव्ह.

संगमनेर मधील कोरोना सत्र थांबेना नव्याने दोन कोरोना पॉजिटीव्ह, एकूण बाधितांची संख्या ११३ वर 
संगमनेर/प्रतिनिधी
   संगमनेर तालुक्यात आज शुक्रवार दि.३ रोजी सकाळी नवीन दोन कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुरण गावात ६३ वर्षीय महिला तर संगमनेर शहरातील मध्यभाग असलेला सय्यदबाबा चौकात एक ७० वर्षीय पुरूष असे दोन रुग्ण कोरोना बाधित आढळले आहे. काल तालुक्यातील पेमरेवाडी येथील एक ३५ वर्षीय पुरूष कोरोना बाधित आढळून आल्यावर आज तालुक्यात मिळून आलेल्या दोन कोरोनाबाधितांची संख्या मिळवता एकूण संख्या ११३ वर जाऊन पोहोचली आहे. संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या जरी झपाट्याने वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही तितकीच जास्त आहे. काल गुरूवार दि.२ रोजी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या विशेष कोविड केअर सेंटरमधून दोन रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आज शुक्रवार दि.३ रोजी अखेर फक्त दहा रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.