Breaking News

प्रगत विद्यालय वनकुटेचा दहावीचा निकाल १०० टक्के !

प्रगत विद्यालय वनकुटेचा दहावीचा निकाल १०० टक्के.
टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्यातील भाऊसाहेब महाराज शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रगत विद्यालय वनकुटेचा इयत्ता १०वीचा २०२० बोर्ड परीक्षेचा निकाल हा १००टक्के लागला आहे.
विद्यालयामध्ये साक्षी पावडे ८६ % टक्के प्रथम क्रमांक, स्वप्नाली भगत ८५.२० % टक्के द्वितीय क्रमांक, शुभम बुचुडे ८२.२०% टक्के  तृतीय क्रमांक मिळवुन  पास झाले आहे.
या परीक्षेसाठी बसलेले सर्व विद्यार्थी हे चांगल्या प्रकारचे गुण मिळवुन पास झाले आहेत...
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सुजित झावरे पाटील सचिव सुदेश झावरे पाटील, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे .