Breaking News

शेतकरी अंधारात | मनसे धावली मदतीला !

शेतकरी अंधारात | मनसे धावली मदतीला
टाकळी ढोकेश्वर
गेल्या दीड महिन्यापूर्वी  चक्री वादळाचा तडाखा आला होता या वादळात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तसेच महावितरण चे ही नुकसान झाले आहे, वादळ शमले पण शेतकऱ्यांचे प्रश्न शमले नव्हते, वादळामुळे अनेक विजेचे खांब कोलमडून पडले, शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो पण अजूनही वादळात पडलेले काही खांब तसेच पडून आहेत,  दीड महिन्यापूर्वी आलेल्या या चक्री वादळाचा तडाखा बसला आणि त्या शेतकऱ्यांचा घरात अजूनही अंधारच आहे, शेतीला पाणी तर देताच येत नाही, जगायचं कसं, काय करावं असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले होते शेतकऱ्यांना  कोणीच वाली उरला नव्हता.  मग सुभाष कडुसकर, भाऊ कडुसकर, ठका डोंगरे,  विठ्ठल लामखडे, बाळू डोंगरे, देवराम डोंगरे, मंजाबा डोंगरे, रोहिदास लामखडे, शांताराम डोंगरे, रत्ना कडुसकर, भाऊसाहेब गुंड, भाऊ भाईक, शरद गगे, बाबाजी डोंगरे, बबन डोंगरे, म्हतू डोंगरे, बबन कडुसकर, चिमाजी आहेर, अशोक डोंगरे या 
शेतकऱ्यांनी थेट मनसे हे दार ठोठावले.
    मनसेचे पारनेर  तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी घेतली, त्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेतली, तेथील सर्व परिस्थितीचा आढावा घेतला, सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली, टाकळी ढोकेश्वर महावितरण सहा. अभियंता यांच्याशी चर्चा केली, लवकरच हे काम मार्गी  लावतो असे आश्वासन दिले. तसेच, दि. २६ रोजी सर्व शेतकऱ्यांना घेऊन  महावितरण कार्यालय मध्ये येवून ठिय्या आंदोलन करणार आहे असे सांगितले. तसेच मनसे आधी प्रेमाने सांगते, हात जोडते, आणि नाहीच ऐकलं तर आपले हात पण खोलते, ही वेळ महावितरण वर येऊ नये, आणि ती वेळ महावितरण वर आलीच तर त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण असेल. कारण आम्ही आमचा झेंडा बदलला आहे, पण दांडा तोच आहे हे विसरू नका असे ते यावेळी म्हणाले. 
यावेळी मनसे  जिल्हा उपाध्यक्ष पप्पू शेठ लामखडे, मारुती रोहकले,  अशपाक हवालदार, जालिंदर बांडे, अविनाश पवार, वसीम राजे, सतीश मस्के  अमोल  झिंझाड,   योगेश पायमोडे, ऋतिकेश कड याचे सहकार्य लाभले.