Breaking News

संगमनेर तालुक्यात एकाच दिवसात आढळले तब्बल १५ कोरोना बाधित !

कुरण गावात ११, शहरात ३ तर पेमरेवाडी येथील एक रुग्ण संक्रमित 
संगमनेर/प्रतिनिधी :
   संगमनेर शहरात आज मंगळवार दि.७ रोजी सकाळी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर दुपारी खाजगी लॅबच्या चाचणीत तीन रुग्ण कोरोना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.
    परंतु रात्र सरता सरता तालुक्यातील प्रति मालेगाव बनू पाहणाऱ्या कुरण गावातील तब्बल ११ रुग्ण कोरोना बाधित असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. कुराण येथे आढळलेल्या ११ बाधितांपैकी ५ महिला तर ६ पुरुष असून यात दोन आठ वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. 
      त्याचबरोबर पेमरेवाडी येथील एका रुग्णाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे आज मिळून आलेल्या एकूण १५ रुग्णांची संख्या मिळवता तालुक्यात एकूण कोरोना बाधित १६५ इतकी झाली आहे.