Breaking News

करंजी भजनी मंडळाच्या वतीने लोकमंथन च्या प्रतिनिधीचा सत्कार !

करंजी भजनी मंडळाच्या वतीने लोकमंथन च्या प्रतिनिधीचा सत्कार
करंजी/प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील करंजी बु या गावचे रहिवाशी प्रा विजय शिवाजी कापसे यांची दै लोकमंथन च्या करंजी ता कोपरगाव च्या प्रतिनिधी पदी निवड झाल्याबद्दल भजनी मंडळ व ग्रामस्ताच्या वतीने सत्कार करण्यात आला.
  या वेळी करंजी तंटामुक्ती समिती चे अध्यक्ष श्री संतोष भिंगारे, कोपरगाव शेतकरी संघाचे संचालक श्री अरुण भिंगारे,माजी सरपंच श्री अनिल डोखे, श्री बाळासाहेब भिंगारे,श्री सोपान भिंगारे,श्री दादासाहेब जोर्वेकर,श्री राजू शेख, श्री भगवंता आगवन,श्री एकनाथ फापाळें,श्री बबन शेळके, श्री दत्तात्रय शिंदे,श्री बाबुराव घाटे, श्री कृष्णा शाहणे आदी ग्रामस्थ व भजनी मंडळ करंजी यांच्या वतीने श्री कापसे यांचा निवडीबद्दल सन्मान करण्यात आले.
     या वेळी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्री संतोष भिंगारे यांनी सांगितले की प्रा कापसे हे करंजी गावातील मोलमजुरी करणाऱ्या कुटूंबात जन्मलेले असून त्यांचा परिवाराने अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत दिवस काढत त्यांचा वडिलांनी श्री शिवाजी कापसे  त्यांचा दोन्ही मुलांना उच्च शिक्षण दिले. त्यात  श्री विजय कापसे हे कोपरगाव येथील सातभाई व्होकेशनल  ट्रेनिंग सेंटर मध्ये प्राध्यापक असून त्यांना लोककलावंत मंच मुंबई यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार देखील मिळाला असून त्यांचा लहान भाऊ इंदोर येथे फार्मा कंपनी मध्ये उच्च पदावर नोकरीस असून असे हे करंजी गावातील रहिवाशी पत्रकार झाले म्हणून सर्व गावकऱ्यांना त्याचा खूप आनंद होत आहे आणि विशेष म्हणजे करंजी गावातील ते पहिले पत्रकार झाले आहे त्यांना त्यांचा भावी वाटचालीस करंजी ग्रामस्थ, करंजी भजनी मंडळ व तंटामुक्ती समिती करंजीच्या वतीने मी शुभेच्छा देतो.