Breaking News

राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीवर, दुसरे राज्यात फिरकताहेत!- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला !

राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीवर, दुसरे राज्यात फिरकताहेत!
- भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा टोला
पुणे/प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला विशेष मुलाखत दिली. यावरून आता विरोधक विरुद्ध ठाकरे असा ‘सामना’ पाहायला मिळत आहे. माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा असे थेट आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले होते. त्यानंतर भाजपाचे नेते आमदार चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत दुसर्‍या वाहिनीला मुलाखत देऊन दाखवाचे असे म्हणत पलटवार केला. तसेच राज्यात सध्या दोन मुख्यमंत्री असल्याचे म्हणतही त्यांनी टोला लगावला. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महाराष्ट्रात सध्या दोन मुख्यमंत्री आहेत. एक म्हणजे जे मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे म्हणजे जे राज्यभर फिरत आहेत, असे म्हणत पाटील यांनी शरद पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर सातवीच्या मुलालाही निबंध लिहायला सांगितला तर तो लिहिल. केवळ कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी सरकार जाणार नाही असे ते म्हणतात. परंतु तिघेही भांडत असतात आणि नंतर काहीही झाले नाही असे म्हणतात, असेही ते म्हणाले. कोंबड झाकून ठेवलं तरी तरी सूर्य उगवायचा राहत नाही. मुख्यमंत्र्यांनी कटूपणा सोडत विरोध आमदारांशी बोलावे आणि पुण्याचीदेखील चिंता केली पाहिजे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.