Breaking News

श्रीगोंदा तालुक्यात पावसाने शेतकरी राजा सुखावला !

श्रीगोंदा तालुक्यात पावसाने शेतकरी राजा सुखावला !
श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी - 
श्रीगोंदा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे 
दि २३ जुलै रोजी श्रीगोंदा शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली श्रीगोंदा शहर , आढळगाव , घारगाव , कोळगाव , बेलवंडी, पारगाव सुद्रीक, काष्टी  आदी भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे सध्या बाजरी ,तूर ,मका कपाशी आदी पिकांची पेरणी झाली आहे पण पिकांना आवश्यक असणारा पाऊस अद्यापपर्यंत झाला नव्हता त्यामुळे शेतकरी चिंतातुर होते पण दि २३  शेतकरी सुखावला आहे दि २४ रोजी देवदैठण मंडळांत ७३. ५ मिलीमीटर ,पेडगाव मंडळ ६८मिमी ,श्रीगोंदा ५२. ५ मिलीमीटर झाला पाऊस झाला आहे 
----
श्रीगोंदा शहरातील रस्त्याला आले होते नदीचे स्वरूप 
श्रीगोंदा नगरपालिकेने मोठा निधी खर्च करून रस्त्ये केले आहेत पण कालच्या पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते