Breaking News

राजकीय संपर्काने देवळालीत कोरोना आणला, देवळाली प्रवरात कोरोनोचे खाते उघडले !

राजकीय संपर्काने देवळालीत कोरोना आणला, देवळाली प्रवरात कोरोनोचे खाते उघडले !
 राजेंद्र उंडे  प्रतिनिधी  देवळाली प्रवरा :
                       देवळाली प्रवरात लाँकडाऊनच्या सुरवाती पासून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चोख व्यवस्था ठेवून कोरोना बाधीत रुग्ण निघणार नाही याची नगर पालिका प्रशासनाने काळजी घेतली.परंतू अखेर कोरोना बाधीत रुग्ण खाजगी प्रयोग शाळेतील तपासणीत बाधीत  आढळला असल्याने  देवळाली प्रवरा शहराचे नाव कोरोना यादीत खाते उघडून  झळाकले आहे.दोन दिवसापूर्वीच तालुक्यातील राजकीय व्यक्ती व त्यांचे कुटुंब बाधीत निघाले आहे.देवळाली  प्रवरातील  तो बाधीत रुग्ण तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याच्या संपर्कात आल्याने  बाधित निघाला आहे.त्या रुग्णाच्या घरातील चार व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
                 याबाबत सविस्तर माहिती अशी की, देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील शेटेवाडी भागातील 36 वर्षीय  व्यक्ती एका दुध संघात  कामावर आहे. त्या दुध संघातील राजकीय नेत्यांशी चांगला संपर्क आहे. या दुध संघातील राजकीय व्यक्ती दोन दिवसापुर्वी कोरोनो बाधीत असल्याचे आढळले आहे.या राजकीय व्यक्तीच्या संपर्कात हा 36 वर्षीय तरुण  होता. राजकीय व्यक्ती बाधीत निघाल्याने  या तरुणाने स्वतःहा खाजगी प्रयोग शाळेत घशातील स्ञाव  तपासणी करुन घेतला असता तो बाधीत असल्याने त्यास देवळाली प्रवरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी  आण्णासाहेब मासाळ यांनी उपचारासाठी नगर येथे पाठविले आहे. तर त्याच्या कुटुंबातील चार व्यक्तींना कृषी विद्यापीठात क्वारंटाईन करण्यात आले आहे. 
                   लाँकडाऊन पुकारण्यात आल्या नंतर देवळाली प्रवरा शहरात येणारे सर्व रस्ते बांबूच्या साह्याने बंद करण्यात आले होते.फेब्रुवारी पासुन जुलैच्या मध्यापर्यंत  कोरोना बाधीत एक ही रुग्ण निघाला नाही.त्यासाठी नगर पालिकेने विशेष काळजी घेतली होती. वेळोवेळी फवारणी, ध्वनीक्षेपकावरुन जाहिर सुचना नागरीकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.कोरोना बाधीत यादीत काल पर्यंत देवळीली प्रवराचे नाव आले नव्हते अखेर देवळाली प्रवराच्या नावावर  त्या 36 वर्षीय तरुणाच्या नावाने शिक्कामोर्तब झाले आहे.नगर पालिकेने शेटेवाडीचा काही भाग पञे ठोकुन लाँकडाऊन केला आहे. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी नागरीकांनी काळजी घ्यावी, सामाजिक अंतर पाळावे, शक्यतो घरी रहा सुरक्षित राहा नागरीकांनी घाबरुन जावू नये अफवांवर विश्वास ठेवू नये.अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून कायदेशिर कारवाई करावी. 

आजी माजी नगरसेवकांच्या संपर्कात 
                      "देवळाली प्रवरा येथील शेटेवाडी भागात कोरोनो बाधीत आढळलेला तरुण राहुरु कारखाना परीसरात आजी माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात असल्याची चर्चा  चालू होती. नगरपालिकेच्या विद्यमान नगरसेवक यांना याबाबत विचारले असता हा तरुण  देवळाली प्रवरा येथील राजकीय व्यक्तींच्या संपर्कात  नसल्याचे सांगितले या तरुणास पाहिलेले नाही.त्यामुळे आमचा संपर्क येवू शकत नाही. त्या नगसेवकाने अधिक माहिती घेवून सांगितले की, हा तरुण एका दुध संघावर  चांगल्या पदावर असून तो सकाळीच दुध संघावर जातो व राञी उशिरा घरी येतो त्यामुळे देवळाली प्रवरा येथील राजकीय व्यक्ती अथवा सर्वसामान्य नागरीकांचा संपर्क येत नाही. परंतू अशा अफवा पसरविणाऱ्यावर  प्रशासनाने कडाक कारवाई करावी अशी मागणीही  त्या नगरसेवकाने केली आहे." 

    "तो क्वारंटाईन असतानाही घरी येतो" 
                   "राहुरी तालुक्यातील राजकीय कुटुंब कोरोनो बाधीत निघाल्या नंतर त्यांच्या संपर्कातील एका दुध संघातील सर्व कामगारांना क्वारंटाईन  करण्यात आले होते. या कामगारांमधील   तो कामगार क्वारंटाईन असतानाही घरी येत होता. नावा पुरता क्वारंटाईन झालेला होता. त्या 36 वर्षीय तरुणाने खाजगी प्रयोगशाळेत  स्वतःचा घशातील  स्ञाव तपासणी करुन घेतला.त्यात तो बाधीत निघाला. क्वारंटाईन असताना तो घरी कसा येत होता.क्वारंटाईनच्या ठिकाणी नेमणूकीस असणारे अधिकारी काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे."