Breaking News

सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी;‘या’ तीन दिवशी मिळणार सुट्ट्या!

सरकारी कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी;
‘या’ तीन दिवशी मिळणार सुट्ट्या!
पुणे । 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारी कर्मचारी आरोग्य यंत्रणेशी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोरोनाशी दोन हात करण्यासोबतच कार्यालयीन कामात गुंतल्याने सरकारी कार्यालयांना सुट्ट्या मिळाल्या नाहीत. यासाठी सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा देण्यासाठी आता राज्य सरकारी कार्यालयांना ३ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
रक्षाबंधनसोबत अनंत चतुर्दशी व घटस्थापना या सणांच्या दिवशीही राज्य सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्यात आल्याने सरकारी कर्मचार्‍यांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर केवळ ३० ते ३५ टक्के कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत सरकारी कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. कोरोनाच्या काळात प्रशासकीय कामकाजात अडथळा येऊ नये, यासाठी लॉकडाऊनच्या काळातही सरकारी कार्यालये सुरूच होती. यामुळे तीन महिन्यांच्या प्रदीर्घ काळानंतर आता सरकारी कार्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जाहीर केला आहे.
------------------------