Breaking News

शिराळ येथे झालेल्या वादात परस्परविरोधात गुन्हा दाखल

पाथर्डी /प्रतिनिधी
     पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथे शेतीच्या वादातुन दोन गटात झालेल्या वादात परस्पर विरोधात गुन्हा दाखल झाला असुन रविवारी फिर्यादी संभाजी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 
अरुण लक्ष्मण गोरे,अमोल श्रीधर वाघ, मिठू मुळे,लक्ष्मण श्रीपती मुळे,रामदास श्रीपती गोरे, रामदास श्रीधर वाघ ,सचिन बद्रिनाथ गोरे,श्रीधर आत्माराम वाघ,अमोल मिनीनाथ वांडेकर,किरण मिनीनाथ वांडेकर,तुकाराम रामभाऊ मुळे व दोन अनोळखी महिला व दोन अनोळखी इसम (सर्व रा. शिराळ) यांच्याविरुद्ध भा.द.वि. कलम ३०७,३२६,३२४,१४३,१४७,१४७,१४९,३४१,३२३,५०४,५०६,४२७,३३७,३३८,१८८ सह आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
              याबाबत पोलिसांकडुन समजलेली अधिक माहिती अशी की,फिर्यादी पालवे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शिराळ ते शिंगवे रस्त्यावर सुरेश किसन वाघ यांच्या वस्तीजवळ  त्यांच्या भावाच्या नावावर असलेली टाटा सफारी गाडी घेऊन त्यांच्या सोबत यातील साक्षीदार यांच्या सह गुरु पौर्णिमानिमित चिचोंडी येथून  दत्ताचे शिंगवे येथे दर्शनासाठी जात असताना रस्त्याच्या कडेला शेततळ्याच्या भिंतीच्या आडोश्याला लपून बसलेल्या वरील लोकांनी साक्षीदार यांचे शेतीचे वादाच्या कारणावरून गैर कायद्याची मंडळी जमवून पालवे यांच्या गाडीवर दगडफेक केली.त्यावेळी साक्षीदार हे गाडीतून खाली उतरले असता त्यांना वरील लोकांनी तलवारीने, लोखंडी गजाने,लाकडी काठीने व दगडाने मारहाण करत जखमी केले आहे.तसेच गोरे यांनी त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीचे पोटात मारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी त्याचा डावा हात मध्ये घातल्याने त्यांचे डाव्या हाताला जबर दुखापत झाली. तसेच फिर्यादी यांचे भाऊ भरत पालवे यांना मुळे यांनी त्याच्या हातातील कुऱ्हाड डोक्यात मारून जबर दुखापत करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.गाडीच्या काचा फोडून नुकसान करून यातील फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ दमदाटी केली आहे.तसेच माननीय जिल्हाधिकारी सो अहमदनगर  यांचेकडील प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.