Breaking News

स्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम.


स्वामी समर्थ विद्यालयाची किरण येरकळ ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम.
पाथर्डी/प्रतिनिधी : 
श्री स्वामी समर्थ विद्यालयाचा इयत्ता दहावी परीक्षेचा १०० % निकाल लागला असून. विद्यालयातील किरण मच्छिन्द्र येरकळ हिने ९७.८०% गुण मिळवत तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच विद्यालयातील जवळ जवळ सर्वच विद्यार्थ्यानी बोर्ड परीक्षेत भरगोस गुण मिळवत घवघवीत यश मिळवले.
      विद्यालयातील किरण येरकळ ९८.८०% गुण मिळवत विद्यालयातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला तसेच समृद्धी पाथरकर ९१.४०% गुण मिळवत विद्यालयातून द्वितीय तर श्रद्धा ढाकणे व पुरुषोत्तम दहिफळे ९०.८०% गुण मिळवत विद्यालयातून तृतीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या शिरपेचात उज्वल यशाचा मानाचा तुरा रोवत विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली. विद्यालयाच्या निकाला बाबतीत विशेष बाब म्हणजे गेल्या तीन वर्षा पासून इयत्ता दहावीचा निकाल १००% लागत असून याही वर्षी ही उज्वल यशाची परंपरा कायम राहिली आहे.
      सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष दिलीपशेठजी भांडकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक एकनाथ ढोले तसेच विद्यालयाचे सहशिक्षक आत्माराम साबळे, सोनाली सराफ, मनीषा बोरुडे, वैशाली घायाळ, गणेश जगताप, सोनाली सोनवणे, प्रविणा गोल्हार, अनिता कानडे, सुधीर पगारे, स्मिता चिंतामणी, प्रसाद मरकड, बंडू गाडेकर, सुरज आव्हाड तसेच शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा होनमणे अनिकेत झेंड आदीने अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.