Breaking News

संवत्सर शाळेत वृक्षारोपण संपन्न .

संवत्सर शाळेत वृक्षारोपण संपन्न .
करंजी/प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपसरपंच श्री विवेक परजणे यांच्या हस्ते वृषारोपन करण्यात आले.
    यावेळी केंद्रप्रमुख दिलीप ढेपले , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा ममता गायकवाड , उपाध्यक्ष नामदेव पावडे , पालक संघाचे अध्यक्ष कृष्णा वरगुडे,मुख्यध्यापक फैय्याजखान पठाण , ग्रामसेवक कृष्णादास अहिरे आदी मान्यवरांच्या उपस्थित शाळेच्या आवरात बहुपयोगी औषधी जांभूळ , आवळा, चिंच , सीताफळ इत्यादी फळ झाडांची लागवड करण्यात आली.
     या वेळी श्री परजणे यांनी शाळेचे कौतुक करत औषधी वृक्ष लागवड करणे हा एक स्तुत्य उपक्रम आसून या मुळे मुलांना देखील औषधी फळ झाडाची ओळख होऊन त्याचा उपयोग काय आहे हे देखील समजण्यास मदत होईल संवत्सरची शाळा ही विविध उपक्रम राबवविणारी शाळा आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील सुंदर परसबाग तसेच फुलझाडे व फळझाडे त्याचप्रमाणे हिरवेगार मोठे वृक्ष विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करतात . 
त्यामुळे दरवर्षी या शाळेत वृक्षारोपण करून एक मूल एक झाड या उपक्रमाद्वारे सर्व झाडांचे जतन केले जाते. यासाठी पालकांचे नेहमीच सहकार्य मिळते.अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक फैय्याजखान पठाण यांनी दिली.
     या सर्व उपक्रमात खारीचा वाटा असणारे सहशिक्षक सलीम शेख , जालींदर अहिरे , संदीप वाघमारे व प्रविण आहेर हे विशेष परिश्रम घेतात.
     याबद्दल शाळेतील सर्वच उपक्रमशील शिक्षकांचे जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा शिक्षण समितीचे सदस्य श्री राजेशआबा परजणे पाटील , कोपरगाव  गटशिक्षणाधिकारी श्री पोपट काळे , शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. शबाना शेख,कृषी अधिकारी श्री पंडीत वाघिरे यांनी अभिनंदन केले .