Breaking News

जामखेडला २५,२६ जुलै रोजी जनता कर्फ्यू, पंचमी उत्सव बंद !

जामखेडला २५,२६ जुलै रोजी जनता कर्फ्यू, पंचमी उत्सव बंद
जामखेड प्रतिनिधी 
राज्यात प्रसिद्ध असलेला नागपंचमी हा सण सालाबादाप्रमाणे दि २५, २६ जूलै रोजी येत आहे. जामखेड शहरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.या उत्सवानिमित्त ग्रामीण भागातून व शेजारील तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदी आणि सणासाठी एकत्र येत असतात. मात्र सद्य स्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात गर्दी होऊ नये व साथीचा फैलाव होऊ नये म्हणून दिनांक २१ जुलै रोजी तहसील कार्यालय येथे  आयोजित दक्षता समितीच्या बैठकीत सर्वानुमते असा निर्णय घेण्यात आला की पंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी दि २५ व २६ जुलै रोजी शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात येईल याची जामखेड शहरातील सर्व दुकानदार व नागरिक यांनी नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महसूल नगरपरिषद व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.