Breaking News

कोरठण खंडोबा मंदिर परीसरातील चांदीच्या पादुकाची चोरी !

कोरठण खंडोबा मंदिर परीसरातील चांदीच्या पादुकाची चोरी !
पारनेर प्रतिनिधी-  
     पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील प्रति जेजुरी म्हणून समजले जाणारे व राज्य शासनाचा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त आसलेले कोरठण खंडोबा देवस्थान परिसरामध्ये चोरीची घटना घडली आहे खंडोबा मंदिरासमोर असणाऱ्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत.घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी भेट दिली असुन पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत माहीती अशी की,कोरठण खंडोबा देवस्थान गडावर सोमवती अमावास्या निमित्त(ता.२०) रोजी
लाॅकडाऊन च्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात धार्मिक कार्यक्रम पार पडला परीसरातच मुख्य मंदीरासमोर खंडोबा देवाची पितळी मुर्ती आहे तेथे बाहेरील बाजूस भाविकांना दर्शन घेण्यासाठी चांदीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत 
पहाटे या परीसरात मोठ्या प्रमाणावर धुके पडते याचा फायदा घेत चोरट्यांनी पहाटे तीनच्या सुमारास या पादुका 
लोखंडी हत्याराच्या सहाय्याने त्या काढुन पोबारा केला आहे याच ठिकाणी खालच्या बाजूस असणा-या भक्तनिवासाच्या दरवाजांच्या कडी कोंडा देखील तोडण्यात आले आहेत मात्र त्या ठिकाणी चोरण्यासाठी काही हाती लागले नाही हा सर्व प्रकार मंदिरामधील सी.सी.टीव्ही मध्ये 
कैद झाला असुन या व्हीडिओ मध्ये दोन चोर तोंडाला कापड(बुरखा)बांधुन पादुका चोरताना दिसत आहेत ही घटना समजल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन मंदीर परीसराची पहाणी केली आज देवस्थान मार्फत पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याची माहीती देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.पांडुरंग गायकवाड यांनी दिली.

दरम्यान मंदिर परिसरामध्ये झालेल्या चोरीबाबत मंदिर प्रशासनाने मोजक्या विश्वस्तांना याबाबत माहिती कळवली मात्र काही विश्वासांना याबाबत अंधारात ठेवण्यात आले याबाबत विश्वस्त चंद्रभान ठुबे यांनी नाराजी व्यक्त केली आहे