Breaking News

उद्या बारावीचा निकाल !

उद्या बारावीचा निकाल
पुणे : महाराष्ट्र उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल उद्या (16 जुलै) रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा पाहता येईल.

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई,  कोल्हापूर,अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात ही परीक्षा पार पडली होती.

‘या’ वेबसाईटवर निकाल पाहता येणार


www.mahresult.nic.in 
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeduction.com

एसएमएसवर निकाल

बीएसएनएल मोबाइलधारकांना एसएमएसवर निकाल पाहता येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना MHHSC <space> <seat no> असा एसएमएस टाईप करुन 57766 वर पाठवावा लागणार आहे. त्यानंतर अवघ्या काही सेकंदात विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल एसएमएस सेवेद्वारे पाठवला जाईल.