Breaking News

संगमनेर तालुक्यात वाढले कोरोनाचे ३७ नवे रुग्ण, एका कोरोना संशयिताचा मृत्यू !

संगमनेर तालुक्यात वाढले कोरोनाचे ३७ नवे रुग्ण, एका कोरोना संशयिताचा मृत्यू !
संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यात आज (मंगळवार दि.२१) रोजी ३७ नवीन कोरोना बाधितांची भर पडली आहे तर एका कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाने दिलेली अधिक माहिती अशी कि, संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास खाजगी लॅब मधून तीन कोरोना पॉजझिटिव्ह रुग्ण मिळाले त्यात शहरातील मालदाड रस्ता,अशोक चौक, आणि देवी गल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यानंतर प्रशासनाकडून केल्या जात असलेल्या रॅपिड अँटीजेन चाचणीमधून ३४ नवे कोरोना बाधित रुग्ण समोर आले. ज्यात संगमनेर शहरातील १० रुग्ण, निमोण येथील १४, घुलेवाडी २, जवळेकडलग ४, तर सुकेवाडी, गुंजाळवाडी, नांदुरी दुमाला  व कोल्हेवाडी येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यासह संगमनेर तालुक्यातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ४२६ इतका झाला आहे. यातील केवळ १४३ रुग्ण उपचार घेत असून उर्वरित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान आज दुपारी संगमनेर शहरातील एक ४८ वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा अहमदनगर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.