Breaking News

परीक्रमा' औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा एम फार्म. प्रथम वर्षाचा ९२% निकाल !

परीक्रमा' औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयाचा एम फार्म. प्रथम वर्षाचा ९२% निकाल.
कष्टी प्रतिनिधी :
काष्टी येथील मा.ना. श्री.बबनराव पाचपुते विचारधारा ट्रस्टच्या 'परीक्रमा' औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील एम फार्म. प्रथम वर्षाचा ९२% लागला असून कोविड-१९ च्या काळात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांने विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांना मिळालेले अंतर्गत गुण व सेमिनार प्रेसेंटेशन यावर केले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख प्रा. राम निखाते व विभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव गाढवे यांनी दिली. निकिता शिंदे व शीतल भोसले (SGPA – 8.85) प्रथम क्रमांकाने,  अबोली जोरी (SGPA – 8.46)  द्वितीय क्रमांकाने, व अशोक डाळिंबे व शिफा शिकालगर (SGPA – 8.38) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. सुनील निर्मळ यांनी दिली.
परीक्रमा शैक्षणिक संकुलात दर्जेदार शिक्षणावर अधिकाधिक भर दिला जातो अशी माहिती संस्थेचे संचालक  प्रतापसिंह पाचपुते यांनी दिली.  
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई पाचपुते, सचिव विक्रमसिंह पाचपुते, संचालक  प्रतापसिंह पाचपुते, संकुल संचालक डॉ. विजय पाटील, व मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. अनिल पुंड यांनी अभिनंदन केले.