Breaking News

सुपा येथे दोन तर भाळवणी येथे एक व्यक्ती कोरोना बाधित !

सुपा येथे दोन तर भाळवणी येथे एक व्यक्ती कोरोना बाधित
पारनेर प्रतिनिधी - 
पारनेर तालुक्यात दि. 25 जुलै रोजी सुपा येथील  दोन तर भाळवणी येथील एक जणांचा अहवाल पॉझिटिव प्राप्त झाला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
सुपा येथील 34 वर्षीय पती व पत्नी तसेच भाळवणी येथील अकरा वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे.
तालुक्यातील 26 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
यामध्ये पाडळी दर्या 13 भाळवणी 8 व कान्हूर पठार 5 जणांचा समावेश आहे
बाधित रुग्ण आढळले आहे तो 100 मीटर परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला असल्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.