Breaking News

कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत सभासदाच्या वारसासदोन लाख नुकसान भरपाई !

कर्मवीर काळे कारखान्याच्या मयत सभासदाच्या वारसास
दोन लाख नुकसान भरपाई
 
  कोपरगाव प्रतिनिधी  -
 कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सभासद सूर्यभान जानकू पानगव्हाणे यांचे गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून जाऊन अपघाती निधन झाले होते. कारखाना व्यवस्थापणाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडून सभासदांची विमा पॉलिसी घेतली असल्याने या कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला २,००,०००/ (अक्षरी रुपये दोन लाख मात्र) नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती. या नुकसान भरपाईच्या रक्कमेचा धनादेश नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत सभासद स्व. सूर्यभान जानकू पानगव्हाणे यांचे वारस त्यांचा मुलगा राजेंद्र सूर्यभान पानगव्हाणे यांना देण्यात आला. यावेळी कार्यकारी संचालक गिरीश जगताप, जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी.सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी एस. डी. शिरसाठ, विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.