Breaking News

संदीप पाटील वराळ जयंती निमित्ताने निघोज येथे रक्तदान शिबिर संपन्न.

निघोज/प्रतिनिधी : 
     निघोजचे माजी सरपंच व बाजार समितीचे माजी उपसभापती संदीप पाटील वराळ यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात १७२ युवकांनी सहभाग घेतला. संदीप पाटील फौंडेशन व निघोज ग्रामस्थ आयोजीत रक्तदान शिबीरास विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलचे वैद्यकीय पथकाने सहकार्य केले. रविवार दि. ५ रोजी निघोज व परिसरातील गावातील संदीप पाटील वराळ प्रेमी ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी संदीप पाटील फौंडेशनचे संस्थापक सचिन पाटील वराळ यांनी संदीप पाटील वराळ यांची जयंती तसेच गेली चार महिन्यांत कोरोना पार्श्वभूमीवर संदीप पाटील फौंडेशन, संदीप पाटील युवामंचने केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. 
     स्वस्त दरात भाजीपाला, गोरगरीब गरजू एक हजार कुटुंबियांना मोफत व घरपोहोच किराणा किटचे वाटप तसेच अनेक सामाजिक उपक्रमाची माहिती दिली. यावेळी परिसरातील सरपंच, उपसरपंच विविध संस्थांचे अधिकारी पदाधिकारी व युवक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्व. संदीप पाटील वराळ यांना पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विळद घाट येथील विखे पाटील हॉस्पिटलचे डॉ राजेंद्र सुर्यनारायण, डॉ ज्ञानेश्वर गाडेकर व डॉ विजय घुले, डॉ प्रदीप बांद्रे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदानासाठी परिश्रम घेतले. सकाळी ११ ते पाच वाजेपर्यंत जैन स्थानक येथे रक्तदान करण्यासाठी गर्दी झाली होती मात्र सोशल डिस्टन्सिंग नियम पाळून रक्तदान करण्यात आले. तसेच विखे पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने प्रत्तेकाची तपासणी करीत याठिकाणी प्रवेश दिला. निघोज येथील जैन समाजबांधवांनी रक्तदान करण्यासाठी जैन स्थानक उपलब्ध करून दिले तसेच विखे पाटील हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने दिवसभर परिश्रम केल्याबद्दल तसेच रक्तदात्यांचे संदीप पाटील फौंडेशन व संदीप पाटील युवामंच वतीने आभार मानण्यात आले. 
       तसेच एस टी बसस्थानक परिसरातील भाजीविक्रेते दुकानदार व्यवसायीक यांना यावेळी मास्क सॅनिटायझर व ग्लोज याचे वाटप संदीप पाटील फौंडेशन व संदीप पाटील युवामंच वतीने करण्यात आले.