Breaking News

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढतोय !

कोपरगाव तालुक्यात कोरोनाचा आलेख वाढतोय !
करंजी प्रतिनिधी-
 कोपरगाव तालुक्यात आज कोरोना धुमाकूळ घातला आसून आज एकूण ५८ संशयितांची अँटीझेन  रॅपिड टेस्ट केली असता त्यात तब्बल १५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
   यात कोपरगाव नगरपालिका हद्दीत तब्बल १२ रुग्ण आढळून आले आहे यात स्वामी समर्थ नगर भागात १० रुग्ण सापडले आहे यात ६ पुरुष व ४ महिला, शिंगी शिंदे नगर येथील १ महिला, कोपरगाव बेट भागातील १ रुग्ण,तसेंच कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव या गावात ३ रुग्ण आढळले आहे यात १ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे.
    या घटनेमुळे इतक्या मोठ्या प्रमाणात कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली असून तरी नागरिकांनी प्रशासनाने दिलेलं आदेशाचे पालन करत सहकार्य करणे गरजेचे असून गरज असेल तेहवाच घराबाहेर पडा स्वतः सोबत कुटूंबाची देखील काळजी घ्या असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. 
     आज कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या पन्नाशी वर जाऊन पोहोचल्याने ही कोरोना साखळी खंडित करण्यासाठी कोपरगाव प्रशासनाला कोपरगाव शहरासह तालुका काही दिवस बंद करण्याची मागणी सामान्य नागरिकांन कडून केली जात आहे.