Breaking News

सोसायटीला स्वमालकीची जागा देणार्या दापत्यांचा ग्रामस्थांकडुन सत्कार !

सोसायटीला स्वमालकीची जागा देणार्या दापत्यांचा ग्रामस्थांकडुन सत्कार
देविभोयरे येथील सेवा सोसायटीला स्वमालकीची जागा बक्षिसपत्र. दिल्याबद्दल गायकवाड दापत्यांचा सत्कार करण्यात आला ( छायाचित्र- संदिप गाडे)

निघोज प्रतिनिधी : 
येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीला स्वमालकीची तीन गुंठे जागा बक्षिसपत्र देणाऱ्या गायकवाड दापत्यांचा  ( रविवारी)देविभोयरे ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.देविभोयरे सोसायटीला जागेचा प्रश्न भेडसावत असताना आता तीन गुंठे जागा मिळाल्याने या सोसायटीची जागेची समस्या मिटली आहे.
  देविभोयरे सेवा सोसायटीची गावात स्वमालकीची इमारत उभी आहे. मात्र सोसायटी मार्फत विविध योजना राबविण्यासाठी जागेची मोठी अडचण येत होती. ही अडचण दुर करण्यासाठी गावातील भागचंद गायकवाड व देऊबाई गायकवाड या दापत्यांसह त्यांचा पुतण्या किसन दादाभाऊ गायकवाड यांनी स्वमालकीची तीन गुठ्ठे जागा सोसायटीला बक्षिसपत्र केली.त्यामुळे या गायकवाड कुटुंबियांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याकामी हारुबाई मुळे, प्रभाकर मुळे व सोपान पडवळ यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमास माजी सरपंच सुभाष बेलोटे,तुकाराम बेलोटे,शिवाजी जाधव, विकास सावंत,अशोक मुळे, दत्तात्रय बेलोटे,विठ्ठल सरडे, बाबुराव मुळे,संपत वाळुंज,गोपीचंद बेलोटे,जयवंत मुळे,रावसाहेब वाढवणे ,मंगेश मुळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.