Breaking News

पढेगावात कोरोनाचा शिरकाव !

पढेगावात कोरोनाचा शिरकाव
करंजी प्रतिनिधी-
 शनिवार कोपरगाव तालुक्यासाठी घातक वार ठरत असून आज सकाळीच कोपरगाव शहरात डॉक्टर च्या संपर्कातील ३ बाधित आढळुन आले होते, त्या नंतर आता १ वाजता आलेल्या रिपोर्ट नुसार तालुक्यात परत २ रुग्णाची भर पडली असून यात कोपरगाव शहरातील गांधीनगर च्या गाजबलेल्या परिसरात एक ५२ वर्षीय पुरुष नासिक येथील पाठवलेल्या खाजगी लॅब च्या अहवालानुसार पॉजिटीव्ह आढळून आला आहे.
     कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील पढेगाव येथील एक ३३ वर्षीय इसम कोरोना बाधित आला असल्याची माहिती तालुका ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   या मुळे कोपरगाव तालुक्यासाठी शनिवार हा कोरोना वार म्हणून समोर येत आहे. आज कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २९ झाली आहे.