Breaking News

योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहर प्रमुख सागर राठोड यांचे निवेदन

पाथर्डी/प्रतिनिधी :
तालुक्यातील माणिकदौंडी येथील पंजाब नॅशनल बॅक श्रावण बाळ/संजय गांधी/इंदिरा गांधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मागील ४ ते ५ महिन्यांपासुन लाभ मिळत नसल्याने शिवसेनेचे शहर प्रमुख सागर राठोड व उपतालुका प्रमुख नवनाथ वाघ यांच्यावतीने नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना निवेदन देण्यात आले आहे.
                या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी २४ वाडया व १२ तांडयातील सुमारे एक हजार लाभार्थींची खाती आहेत.यासंबंधी माणिकदौडी येथील पंजाब नॅशनल बँक यांच्या व्यवस्थापकांना सांगितले असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात.तरी यामध्ये प्रशासनाने जातीने लक्ष घालुन संबंधित बँकेला योग्य त्या सूचना द्याव्यात व वंचित झालेल्या लाभार्थ्यांना त्यांची रक्कम लवकरात लवकर मिळवुन द्यावी.
अशी मागणी पाथर्डी शहरा शिवसेना शहर प्रमुख श्री सागर राठोड व उपतालुका प्रमुख नवनाथ वाघ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.