Breaking News

रॅपिड चाचणीमधील ६७ रुग्णांवर उपचार चालु;नागरिकांनी संभ्रम करून न घेण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दराडे यांचे आवाहन !रॅपिड चाचणीमधील ६७ रुग्णांवर उपचार चालु;नागरिकांनी संभ्रम करून न घेण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.दराडे यांचे आवाहन !
पाथर्डी/तालुका प्रतिनिधी :
तालुक्यातील ४७ रुग्णांना पूर्ण दहा दिवस उपचार करत डिस्चार्ज दिला असुन,रॅपिड चाचणी मध्ये
कोरोनाबाधित आढळून आलेल्या ६७ रुग्णांवर आजही उपचार चालु असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली आहे..

डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची माहिती पुढीलप्रमाणे:
कोल्हार येथील १७,आगासखांड येथील २,त्रिभुनवाडी येथील ५,या रुग्णांवर १० जुलै रोजी उपचार सुरू करण्यात आले होते.तसेच पिपळगाव टप्पा येथील १ रुग्णांवर ९ जुलै पासुन उपचार  करत२० जुलै रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तर तिसगाव येथील ३,खाटीक गल्ली ८,मौलाना आझाद चौक ८ रुग्ण यांच्यावर १२ जुलै पासुन उपचार करण्यात आले.तसेच पुणे येथून आलेले आगासखांडचे ३ जणांवर ९ जुलै पासुन उपचार करण्यात आले होते.त्यांना २१ जुलै रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे.अशा ४७ कोरोनाबाधित रुग्णांवर दहा दिवस उपचार करत डिस्चार्ज देण्यात आला असुन, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा संभ्रम करून न घेण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.भगवान दराडे यांनी केले आहे.