Breaking News

राहुरी पोलिस ठाण्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण !

राहुरी पोलिस ठाण्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण 

कारागृहाच्या बंदोबस्तावरील पोलिसांची कोरोनाची तपासणी होणार 
देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
                     राहुरी पोलिस ठाण्यातील कारागृहात पोलिस कोठडीतील दोन           कैदी मंगळवारी कोरोना बाधीत आढळले.त्यांच्या समवेत असलेल्या  सात कैदी खोकल्याने हैराण झाले आहेत. दोन कैदी कोरोना बाधीत आढळल्यावर   कारागृहाच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिस कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणीसाठी स्ञाव  घेण्यात आल्याने संपर्कात आलेल्या पोलिसांमध्ये  खळबळ उडाली आहे.
                     संगमनेर पोलिस ठाण्यातुन  चार कैद्यांना चार दिवसापूर्वी राहुरीपोलिस ठाण्यातील  कारागृहात आणले होते. राहुरी तालुक्यातील  कणगर  येथे मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या  चोरीप्रकरणी त्यांना राहुरी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. या चार कैद्यांना राहुरी पोलिस ठाण्यातील  कारागृहात ठेवले होते. त्यांच्या कोरोना तपासणी अहवालात दोन कैदी कोरोना बाधित आढळले. त्यामुळे, चार दिवसांपासून कारागृहातील सुरक्षा व्यवस्था पहाणाऱ्या  पोलिस कर्मचाऱ्यांना  कोरोनाची लागण झाली की, नाही याची तपासणी करण्या करीता  कृषी विद्यापीठात  हलविण्यात आले. त्याठिकाणी त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे स्ञाव  घेण्यात आले आहेत. 
                   राहुरी  पोलिस ठाण्यातील कारागृहात  ११ कैदी ठेवण्यात आले  आहेत. चार कैद्यांना कोरोना बाधीत आढळल्याने इतर कैद्यांची कोरोना तपासणी केली जाणार आहे. त्या सात कैद्यांना खोकला व इतर लक्षणे दिसत आहेत. संगमनेर येथुन या आरोपींना  आणण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकाची कोरोना तपासणी केली जाणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांचे  धाबे दणाणले आहेत.   महसूल पाठोपाठ पोलिस खात्यातही कोरोनाची बाधा पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
         राहुरी पोलिस ठाण्यातील  चार कैदी व एका पोलिस कर्मचाऱ्यांची रॅपिड कोरोना चाचणी घेतली.  या चाचणीत दोन कैदी कोरोना बाधीत आढळले.राहुरी पोलिस ठाण्यातील  कारागृहात सुरक्षेसाठी बंदोबस्तावर  असलेल्या  सात पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोना तपासणी केली आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.  वैद्यकिय अडचणीमुळे  इतर पोलिसांची कोरोना तपासणी उद्या केली जाईल. 
----------
  डॉ. नलिनी विखे  तालुका आरोग्य अधिकारी,राहुरी