Breaking News

कोपरगाव शहरातील वाढत्या कोरोना संख्येने घबराट.

कोपरगाव शहरातील वाढत्या कोरोना संख्येने घबराट.
करंजी प्रतिनिधी-
 काल शनिवार दि २५ जुलै रोजी शहरात ८ रुग्ण सापडले होते त्यांचा संपर्कातील एकूण ७० लोकांना काल प्रशासनाने कोपरगाव केअर सेंटर मध्ये ठेवले होते त्या पैकी ५० जणांचे स्वाब नगर येथे पाठवले आहे, आणि २० जणांची आज केअर सेंटर मध्ये रॅपिड टेस्ट केली असता त्यात ३ अहवाल पॉजिटीव्ह आली असल्याची माहिती कोपरगाव चे तहसीलदार श्री योगेश चंद्रे साहेब यांनी दिली आहे.
       
        सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील मध्यवर्ती भागातील काले मळा या लोकवस्तीतील ५२ वर्षीय व २८ वर्षीय बाप लेक पॉजिटीव्ह आढळून आले आहे तसेच गांधी नगर परिसरातील झेंडे गल्ली भागातील एक ५२ वर्षीय इसम कोरोना बाधीत आढळून आल्याने प्रशासनाने वरील दोन्ही परिसर कन्टेनटमेंट झोन म्हणून घोषित करत सील केले असून सदर भागात प्रशासनाच्या वतीने योग्य त्या उपाययोजना करण्याचे काम सुरू केले आहे.
      
    नगर येथे पाठवलेले ५० अहवाल उद्या संध्याकाळ पर्यंत प्राप्त होऊ शकतात त्या मुळे कोपरगावरांनी खूप काळजी घेणे गरजचे असून स्वतः सोबत परिवाराचे रक्षण करणे गरजेचे होऊन बसले आहे.