Breaking News

पोलिसावर दुचाकीवर नियमाचे पालन न केल्यामुळे पारनेर मध्ये गुन्हा दाखल होणार - तहसीलदार ज्योती देवरे

पारनेर/प्रतिनिधी :
 दुचाकीवर एक जण तीनचाकी गाडीवर  तीनजण चारचाकी गाडीवर तीन जण जाण्यास परवानगी असताना रमेश भास्कर दरेकर कॉन्स्टेबल भिंगार पोलीस स्टेशन दत्तात्रय मस्के हे दोघे दुचाकीवरून डबलसीट जाताना पारनेर येथे तहसीलच्या पथकाने आडवले त्यांनी यावेळी पथकावर हात उगारला त्यामुळे रमेश भास्कर दरेकर या पोलीस कॉन्स्टेबल सह त्याच्या सोबत असणाऱ्या वर पारनेर पोलीस स्टेशन मध्ये 188 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे. अशी माहिती तहसीलदार ज्योती देवरे यांनी यांनी दिली
पारनेर येथे आंबेडकर चौकामध्ये तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह पथकाने नाकेबंदी केलेली आहे त्या ठिकाणी टू व्हीलर व फोर व्हीलर या गाड्यांवर येणाऱ्या प्रवाशांवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे पालन  न करणाऱ्यावर वर कारवाई करण्यात येत असून त्या ठिकाणी भिंगार येथील पोलीस कर्मचारी स्थानिक प्रशासनाने घालून दिलेले नियम तोडत दुचाकीवरून डबलसीट प्रवास करत असताना पारनेर येथे या पथकाने त्याला अडवले असता त्यांनी हात पथकावर हात उगारण्याचा प्रयत्न केला तसेच दुचाकीवरून डबल शिफ्ट प्रवास केला म्हणून त्याच्यावर 188 नुसार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया  सुरू आहे पोलीस कर्मचाऱ्यावर  नियमावलीचे पालन न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे 
   पारनेर येथे विनाकारण फिरणाऱ्या ची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे कोरोना चा धोका वाढला आहे दुचाकी एक तीनचाकी तीन चारचाकी तीन वाहनांवरून प्रवास  करण्यास परवानगी आहे  मात्र अनेक नागरिक पालन करत नाही म्हणून तहसील प्रशासनाने पारनेर येथे नाकेबंदी केली असून या नाकेबंदी दरम्यान ही कारवाई करण्याचे काम सुरू आहे.