Breaking News

आरोग्य सेवेचा दर्जा वाढवून रुग्ण हिताचे निर्णय घ्या – आमदार आशुतोष काळे

आरोग्य सेवेचा दर्जा वाढवून रुग्ण हिताचे निर्णय घ्या – आमदार आशुतोष काळे
  कोपरगाव प्रतिनिधी -
रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळावी यासाठी रुग्ण कल्याण समितीने आरोग्य विभागाला येणाऱ्या अडचणी तातडीने सोडवाव्या. रुग्णांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढवून रुग्ण हिताचे निर्णय घ्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांना दिल्या आहेत.
       कोपरगाव ग्रामीण रुग्णालय येथे आमदार आशुतोष काळे यांनी रुग्ण कल्याण समितीची बैठक घेतली. या बैठकीसाठी तहसीलदार योगेश चंद्रे, रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, सदस्य सभापती सौ. पोर्णिमा जगधने, डॉ.अजय गर्जे, पोपट काळे, सौ. गीता देवघुणे,संजय भावसार, डॉ. संतोष विधाते, डॉ. जितेंद्र रणदिवे, सचिव डॉ. कृष्णा फुलसौंदर आदी उपस्थित होते. यावेळी रुग्ण कल्याण समितीच्या अधिकाऱ्यांना सूचना करतांना आमदार आशुतोष काळे पुढे म्हणाले की, आरोग्यसेवेतील सर्व कर्मचारी प्रत्यक्षपणे नेमणुकीच्या ठिकाणी नियमित हजर असणे बंधनकारक करून  यापुढे कोणत्याही आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला घरी बसून वेतन मिळणार नाही याची दक्षता घ्यावी. बैठकीच्या माध्यमातून झालेल्या चर्चेतून अडचणी लवकर सोडविल्या जावू शकतात व रुग्णांना चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा मिळू शकते त्यासाठी वेळोवेळी बैठकांचे आयोजन करावे. शासन नियमानुसार रुग्ण कल्याण समितीची बैठक सहा महिन्यांनी घेतली जावी असा शासन निर्णय असला तरी रुग्ण कल्याण समितीची बैठक दर तीन महिन्यांना घ्यावी.रुग्ण कल्याण समितीला मिळणारा निधी खर्च करतांना पारदर्शकता वाढवा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप आदी रुग्णांची तपासणी करतांना सुरेगाव घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी काळजी घ्यावी. रुग्णांना सोयी-सुविधा देण्यात ग्रामीण रुग्णालयाच्या अडचणी कायमस्वरूपी मार्गी लावू अशी ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. यावेळी ग्रामीण रुग्णालयात सुरु असलेल्या दुरुस्तीच्या कामांची पाहणी करून सद्यस्थिती पाहता कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना ठेकेदारांना केल्या.
 फोटो ओळ- रुग्ण कल्याण समितीच्या  बैठकीत मार्गदर्शण करतांना आमदार आशुतोष काळे .