Breaking News

खडकवाडी आडरानात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली खुनाचा गुन्हा दाखल !

खडकवाडी आडरानात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली खुनाचा गुन्हा दाखल
पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील खडकवाडी शिवारात दि २६ रोजी पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले याबाबत पोलिसांनी ओळख पटत नसल्याने अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र त्यांची ओळख पटल्यानंतर मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
     पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार खडकवाडी शिवारमधील आडरानात तालुका पारनेर येथे दि 26 रोजी पुरुष जातीचे मृतदेह सापडला होता याबाबत पोलिसांनी तपास केल्यानंतर तो राघू सहादु कोकरे वय 45 वर्ष राहणार ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर याचा असून  दि 20 ते 26 च्या दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून अज्ञात हत्याराने डोक्यात मारून खून केला आहे व  मयताची ओळख पटू नये याकरिता प्रेत खडकवाडी शिवरामधील आडरानात नेऊन ठेवले आहे अशी फिर्याद जनाबाई राघू कोकरे वय 40 वर्ष धंदा मजुरी मुळ राहणार  ढवळपुरी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर ह. मु. वायशेत ता अलिबाग जि रायगड हिने दिली आहे. त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
    हा तपास पोलीस अधीक्षक सागर पाटील उपविभागीय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत.