Breaking News

पारनेर तालुक्यात नवीन चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

पारनेर तालुक्यात नवीन चार जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

दोन दिवसात पारनेर तालुक्यात अकरा  
जणांना कोरोनाची लागण. तालुक्याचा कोरोनाचा आलेख वाढत आहे त्यामुळे चिंता वाढली...

पारनेर/ प्रतिनिधी :
  पारनेर तालुक्यातील  सोबलेवाडी नांदूर पठार पळसपुर वडुले येथील या चार गावांमधील प्रत्येकी एकाचा असे चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे हा चिंतेचा विषय होत आहे तसेच स्थानिक लोकांना कोरोना ची बाधा झाली असल्याची माहिती समोर येत आहे काल दिवसभरामध्ये सात जणांना कोरोना ची लागण झाली आज सकाळी आलेल्या अहवालामध्ये चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चारही गावे एक दिवसासाठी बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत. 
    दरम्यान वडुले या व्यक्तीने खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी केली होती तिचा अहवाल आज प्राप्त झाला त्यानुसार ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे ही व्यक्ती स्थानिक आहे मात्र  व्यक्तीची मालवाहतूक गाडी असल्याचे समजते त्यामुळे त्यातूनच हा संसर्ग झाली असण्याची शक्यता आहे.