Breaking News

करंजी अहवाल अजूनही प्रलंबित !

करंजी अहवाल अजूनही प्रलंबित !
करंजी/प्रतिनिधी-
मागील २ दिवसांपूर्वी वैजापूर येथुन पोटाच्या आजारावर उपचार घेऊन पुढील उपचारासाठी करंजी परिसरातील नावगिरे वस्ती येथील एक ३४ वर्षीय महिला कोपरगाव येथील धारणगाव रोड च्या प्रसिध्द हॉस्पिटलमध्ये दाखल झाली असता तेथील डॉक्टराच्या काळजी वाहू पणा मुळे त्यांनी पुढील उपचार करण्याअगोदर तिचे स्वाब नासिक येथे खाजगी लॅब ला पाठवले असता ती कोरोना पॉसिटीव्ह आढळून आली होती.
  प्रशासनाने तिच्या संपर्कातील कुटूंबतील ६ संशयिताना कोपरगाव येथे विलगिकरन कक्षात  ठेऊन त्यांचे स्वाब नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी पाठवले असून ते अद्यापही आलेले नाही.                     तरी कोपरगाव प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून आज त्यांची रॅपिड किट द्वारे तपासणी केली असता ते ६ ही संशयित निगेटीव्ह आढळून आले आहे आशी माहिती कोपरगाव वैद्यकीय अधिकारी डॉ फुलसौंदर यांनी दिली आहे. 
       त्यामुळे सध्यातरी प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला असला तरी, नगर येथील करंजी चे पाठवलेले ६ नमुन्यांचे अहवाल अजूनही प्रलंबीत आहे हे पण लक्ष्यात घेण्यासारखे आहे.