Breaking News

संगमनेरात कोरोनाचा बारावा बळी.

संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर शहरातील सय्यदबाबा चौक येथील ७० वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा आज मंगळवार दि.७ रोजी  नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोना बळींचा आकडा आता १२ वर जाऊन पोहोचला आहे. दि.३ जुलै रोजी सदरील रुग्ण कोरोनाबाधित आढळून आला होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.